चक्क सरपंच यांनी पाडले स्वतःचे घर

0
798

चक्क सरपंच यांनी पाडले स्वतःचे घर

अतिक्रमणाच्या कार्यवाही पासून सुटण्यासाठी सरपंचाची धडपड

 

चामोर्शी (गडचिरोली), सुखसागर झाडे
अतिक्रमण करून सरपंच होण्यापूर्वी बांधलेल्या घराला चक्क सरपंचांनी सरपंचपदासाठी पाडले. मुधोली चक नं.२ येथील या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकाच चर्चेला उधाण आले.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेल्या मुधोली चक नं.२ येथील सरपंच अश्विनी रोशन कुमरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणाच्या जागेत घर बांधले होते.अज्ञात इसमाने त्यांच्या अतिक्रमण विरुद्ध ग्रामपंचायत मध्ये नमुना आठ ची मागणी केली होती. ही गोष्ट ग्रामसेवक यांनी सरपंच यांना कळवताच आज दिनांक ३१ जुलै रोजी सरपंच पद कायम राहावे यासाठी सरपंचांनी आपले घर पाडले त्यामुळे आजच्या काळात लोकांना सरपंच पद किती प्रिय आहे हे यातून पाहायला मिळते.

 

 

राज्य निवडणूक आयोगाने अतिक्रमणधारकांना सर्व ग्रामपंचायत सदस्य होण्यापासून परावृत्त करण्यासाठी अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांची पद रिक्त झाली त्याच भीतीने मुधोली चक्क नं. २ येथील सरपंच यांनी देखील आपले घर पाडले व पद कायम ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here