केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पोंभुर्णा नगरपंचायतची गगनभरारी

0
454

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पोंभुर्णा नगरपंचायतची गगनभरारी

वेस्ट झोन मध्ये २३ व्या तर राज्यातुन १७ व्या क्रमांकावर मारली बाजी

पोंभुर्णा :-केंद सरकार पुरस्कृत स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत पोंभुर्णा नगरपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.या सर्वेक्षण अभियानात देशातील वेस्ट झोन मधुन २३ व्या तर राज्यात १७ व्या क्रमांकावर पोंभुर्णा नगरपंचायत ने बाजी मारली आहे. या सर्वेक्षणात देशातील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांची स्पर्धा घेतली जाते.स्वच्छ सर्वेक्षण अभियान चा पुरस्कार मिळाल्याने व्हाईट हाऊस ची इमारत असलेल्या पोंभुर्णा नगरपंचायत ची ओळख संपुर्ण भारतात झाली आहे.
पोंभुर्णा शहरात घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येतो.प्रत्येक वार्डात साफ सफाई कर्मचारी मार्फत केले जाते.सदर कचरा गोळा करून ते डंपिंग ग्राऊंडवर जमा केला जातो.व त्या ठिकाणी यावर प्रकीया करून खत निर्मिती केली जाते. या सर्व कामांची व शहराची तपासणी एका संस्थेमार्फत केली गेली यात देशात चार झोन मध्ये रुपांतर केले या प्रत्येक झोन मधुन १०० शहरे निवडण्यात आलीत या सर्वेक्षणाचा निकाल नुकताच जाहीर झाला यात पोंभुर्णा नगरपंचायत ने गगणभरारी घेत वेस्ट झोन मधुन २३ व्या तर राज्यातुन १७ व्या क्रमांकावर बाजी मारली आहे.
मागच्या वर्षी पोंभुर्णा शहराने सन २०१८-१९ मध्ये वेस्ट झोन मधून सिटीझन फिडबॅक मध्ये प्रथम क्रमांक घेऊन देशपातळीवर पोंभूर्ण्याचे नाव उंचावले होते आता पुन्हा त्यात भर पडली आहे.
यात तत्कालीन मुख्याधिकारी विपिन मुग्दा,तसेच विद्यमान मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी सुशांत आमटे, सिटी को आर्डिनेटर महेंद्र निमजे यांनी प्रत्यक्षात मोलाचे योगदान दिले तसेच त्यांना साथ मिळाली नगरपंचायत च्या नगराध्यक्षा सौ श्वेताताई वनकर, उपाध्यक्षा सौ रजिया कुरेशी, नगरपंचायत चे प्रथम नगराध्यक्ष व गटनेते गजानन गोरंटिवार, नगरपंचायत पोंभुर्णा चे गटनेते अतिक अहमद कुरेशी, ईश्र्वर नैताम नगरसेवक,मोहन चलाख नगरसेवक,अजित मंगळगीरीवार नगरसेवक, जयपाल गेडाम नगरसेवक, सुनिता मॅकलवार नगरसेविका,सविता गेडाम नगरसेविका व नगरपंचायत पोंभुर्णा चे संपुर्ण नगरसेवक व सर्व कर्मचाऱ्यांचे.या सर्वांच्या सहकार्याने पोंभुर्णा नगरपंचायत देशपातळीवर पुन्हा एकदा नाव झाले आहे हि पोंभुर्णा नगरवासियांसाठि अभिमानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here