गडचिरोली शहरातील शेकडो युवकांचा मोठ्या उत्साहात शिवसेनेत प्रवेश
गडचिरोली✍️ सुखसागर झाडे:-
गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार साहेब यांच्या मार्गदर्शनाने गडचिरोली शहरातील युवकांमध्ये सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्य
करण्याचा एक उत्साह निर्माण करून शिवसेना गडचिरोली विधानसभा जिल्हाप्रमुख वासुदेव किसनजी शेडमाके यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून शेकडो युवकांचा भगवा दुपट्टा व शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.
तत्पूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गडचिरोली जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांनी उपस्थित युवकांसह बैठक घेत शिवसेनेचे ध्येय धोरण तसेच शिवसेनेचे विचार यांची जाणीव करून देत शिवसेनेची बांधिलकी जपत एकनिष्ठ राहून शहरातील समस्या सोडविण्यास कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुनील पोरेड्डीवार मार्गदर्शन करताना म्हणाले शिवसेनेचा जन्म गोरगरीबाना न्याय मिळवुन देण्यासाठी झाला आहे. मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा निखारा हातात घेऊन पुढे जाणारे आम्ही शिवसैनिक जनतेच्या न्याय हक़्कासाठी रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. सत्ता असो वा नसो आमचे जनसेवेचे कार्य अविरत सुरु राहणार असा संकल्प केला . यावेळी उपस्थित तालुकाप्रमुख (ग्रामीण) गजानन नैताम, त्रिलोक शर्मा, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख अश्विनीताई चौधरी, व तसेच नवनिर्वाचित शिवसैनिक नागनाथ (राजूभाऊ) भुसारे, दीपक भारसाकळे, सलमान शेख, अजय तुमराम, सचिन राठौड़, तालिब पठान, अनुज तलांडे, अभिषेक गंडाते, नीलेश सातपुते, अंकुश नेताम, नीलेश भारसाकले, अशोक चैपल, प्रणय गेडाम, संजोग बोबाटे, सार्थक खान, रोहित नैताम , साई गणवेनवार, श्लोक चापले, शिवम बारड, हर्ष बावणे, आकाश काटवे व असंख्य युवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.