जन शिक्षण संस्थान चंद्रपूर – २ येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा.
बल्लारपुर/ चंद्रपूर- नागेश नेवारे
दिनांक 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येतो याच दिनाचे औचित्य साधून जनशिक्षण संस्थान चंद्रपूर २ येथे प्रशिक्षणार्थींना कौशल्य व्यवस्थापन , व्यक्तिमत्व विकास याबाबत कार्यक्रम घेण्यात आला. जन शिक्षण संस्थान चंद्रपूर दोन ही संस्था कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने चालणाऱ्या विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगाराकडे पाऊल टाकण्यास अनेकांना सक्षम करत आहेत. यामुळे त्या व्यक्तींना आर्थिक मदतही होईल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल या हेतूने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही संस्था काम करीत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एपी पिल्लई आयटीआय चे प्रिन्सिपल निखिल गणवीर सर उपस्थित होते. सोबतच प्रमोद राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सोबतच जनशिक्षण संस्थान चे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार संस्थेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्वप्निल चिकटे यांनी केले.