मुंबई प्रतिनिधी: महेश कदम
साईभक्त व प्रसिध्द गीतकार श्रावण बाळा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा लेखणीतुन अवतरलेले नवीन पिढीतील साईगीत.
महाराष्ट्राचे गीतकार/ गायक म्हणून ओळखले जाणारे साईभक्त श्रावण बाळा यांचा आज वाढदिवस. ज्यांच्या भजनांने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. श्रावण बाळा यांचा जन्म १३ जुलै १९६१ रोजी इंगळे या परिवारात झाला. त्यांच पुर्ण नाव श्रावण राजाराम इंगळे. मुळचे लालबागकर त्यांनी प्रथम सुरवात केली ती १९८६ साली साईलीला पालखीची, मुंबई ते शिर्डी असा पायी प्रवास आयोजन. मग त्यांनी हळू हळू साई भजनांकडे वाटचाल करून पहिली कॅसेट काढली ती म्हणजे १९९१ ला…..तिथून जणू काही साई प्रवासाला सुरुवात झाली ती आता पर्यंत २२५ सीडी काढण्यात आली. ३५०० पेक्षा जास्त भजने लिहिली गेली…..तरी अजून ही देखील त्यांची लेखणी थांबली नाही….दरवर्षी रामनवमी ला न चुकता साईभक्तांसाठी या गीतांच्या माध्यमातून एक खास साई भजनांचा नजराणा असते. त्यांनी लिहिलेल्या गीतांनी आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे गायक…. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, उत्तरा केळकर, रविंद्र साठे, सुदेश भोसले, अनुप जलोटा, अजित कडकडे, चंद्रशेखर गाडगीळ, कविता कृष्णमूर्ती, अभिजित सावंत, आणि स्वप्नील बांदोडकर अनेक गायकांनी गायली आहेत…त्यांचा स्वतःचा झाले तुझे दर्शन साई या नावाचा रंगमंच सुध्दा आहे. झाले तुझे दर्शन साई… या कार्यक्रमाचे निर्माण त्यांनी केले. त्यांचा मार्गदर्शनाखाली अनेक तरुण पिढी त्यांचा बरोबर गीत व संगीताचे धडे घेत आहेत.
आता पर्यंत महाराष्ट्रात १००० च्या वर कार्यक्रम झाले….तसेच महाराष्ट्रात भजनामधील सर्वात मोठं नाव.लालबाग, परळ , दादर माहिम, गिरगाव,घाटकोपर, जोगेश्वरी अश्या मध्यम वर्गीय भागात तरूणांना साई भजनांच वेड लावणारा अवलिया गीतकार. सध्या ते सेंट्रल पी.डब्लु.डी मध्ये कार्यरत आहेत. त्यांच आताच वास्तव्य कांदिवली येथे…
अश्या या अवलिया गीतकार श्रावण बाळा यांच्या लेखणीतुन अवतरलेले अजरामर साईगीत, ह्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!