एक अटक, दोन फरार, तीन अनोळखी यांचा शोध सुरू.
प्रतिनिधी/ढाणकी -उमरखेड-मनोज राहुलवाड
दिनांक २८ जून रोजी सायंकाळी सहा वाजता च्या सुमारास आडजात लाकडाने भरलेला ट्रक क्रमांक एम एच ३८ डी ७८६० ढाणकी येथील पेट्रोल पंपाजवळ, नागोराव परमेश्वर गाजूलवार वनरक्षक पिंपळगाव बीट यांनी पकडला. घटनास्थळी ट्रक मधील लाकडांचा लक्ष्मण दारू राठोड व अक्षय दिंगार भिमटे पिंपळगाव या पंचासमक्ष पंचनामा करीत असताना, तेथे हादीभाई लकडी ठेकेदार ढाणकी, बशीर बदक ढाणकी, जावेद रज्जाक (ल्याहरीवाले) ढाणकी यांच्यासह इतर तीन लोकांनी पंचनामा करणाऱ्या वनरक्षकास अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सदर ठिकाणी वरील घटनेची व्हिडिओ शूटिंग आरोपी करू लागले. सरकारी कामात अडथळा आणत फिर्यादीस घेराव घालून आरोपी ट्रक घेऊन पसार झाले. यात आरोपी बशीर बदक यांना अटक झाली असून न्यायालयाच्या निर्णयानुसार आरोपींची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली असून, हदीभाई लकडी ठेकेदार व जावेद रज्जाक हे फरार असून यासह तीन अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. सदर आरोपींवर कलम ३५३,२९४,१४३,५०६ नुसार बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांचे मार्गदर्शनात, रामकिसन जायभाये यांचे नेतृत्वात, देविदास हाके, रवी गिते, गजानन खरात, सतीश चव्हाण, मोहन चाटे, दत्ता कुसराम, अतिश जारंडे, नरेंद्र खामकर हे करीत आहेत.
तसेच ढाणकी आराम मशीन ला लागून असलेल्या खुल्या जागेत भरपूर प्रमाणात तोडलेल्या लकडीचे ढिग असुन हेसुध्दा वैध आहे की अवैध ? वनविभाग याचीही कसून चौकशी करणार का ? अशी चर्चा गावात सर्वत्र रंगली आहे.