लालपेठ येथील स्ट्रीट लाईट सुरु करा – यंग चांदा ब्रिगेड संघटक कलाकार मल्लारप यांची मागणी
मनपा आयुक्तांना निवेदन
लालपेठ कॉलरी येथील बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी केली असून या मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने लालपेठ कॉलरी येथे स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहे. मात्र मागील काही महिन्यापासून हे लाईट बंद असल्याने येथील रस्त्यांवर काळोख अंधार असतो, त्यामुळे असामाजिक तत्वांचा वावर येथे वाढला आहे. लूटमार, चोरी सारख्या घटना घडण्याची भीती बढवाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसचे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने येथील रस्त्यांवर पडलेल्या खाड्यांमध्ये पाणी साचून राहते रात्रीच्या अंधारात ते दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यताही या भागात निर्माण झाली आहे. अंधारामुळे विषारी जीव जंतूंचाही धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता बंद असलेले हे स्ट्रीट लाईट सुरु करण्यात यावे अशी मागणी होत आहे. या मागणी संदर्भात यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची भेट घेतली असून सदर मागणीचे निवेदन त्यांना दिले आहे. विषयाची गांभीर्यता लक्षात घेत मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनीही लवकर हे स्ट्रीट लाईट सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.