आमदार किशोर जोरगेवार यांनी वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट देत केली आर्थिक मदत

0
758

आमदार किशोर जोरगेवार यांनी वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेट देत केली आर्थिक मदत

चंद्रपूर/प्रतिनिधी : शेतात काम करत असताना 45 वर्षीय गोवर्धन किशन गोहणे या शेतकऱ्याच्या मृत्यू झाल्याची घटना सोनेगाव येथे घडली. घटनेची माहिती होताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना आर्थिक मदत केली आहे.
सध्या चंद्रपुरात मेघ गर्जणासह पाऊस सुरू आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास सोनेगाव येथील गोवर्धन गोहणे हे शेतात काम करण्यासाठी गेले होते यावेळी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सोनेगाव गाठत मृतक गोवर्धन यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. मृतक गोवर्धन यांच्या पत्नीचे तीन वर्षांपूवीच निधन झाले आहे. त्यामुळे गोवर्धन हेच आपल्या दोन मुलांनाच सांभाळ करत होते मात्र आता त्यांचेही निधन झाल्याने त्यांचे दोन्ही मुले अनाथ झाले आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. अशात आ. जोरगेवार यांनी सदर कुटूंबाला आर्थिक मदत करत शासकीय मिळणारी मदतही तात्काळ मिळावी या करिता प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here