Home चंद्रपूर ताडोबातील जखमी असलेला छोटा मटका उपचारासाठी जेरबंद

ताडोबातील जखमी असलेला छोटा मटका उपचारासाठी जेरबंद

0
222

ताडोबातील जखमी असलेला छोटा मटका उपचारासाठी जेरबंद

मे महिन्यात झालेल्या झुंजीत जखमी, चंद्रपुरात टीसीसी सेंटर मध्ये उपचार…

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी बफर वनपरिक्षेत्र अंतर्गत कक्ष क्रमांक ५१ मधील गंभीर जखमी अवस्थेत असलेला छोटा मटका नावाने पर्यटकात प्रसिद्ध असलेला सिएम(टी १२६) वाघाला बचाव पथकाने यशस्वीपणे जेरबंद केले.जखमी वाघाच्या आवश्यक वैद्यकीय तपासणी नंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले.

ही मोहीम वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी व व्याघ्र संरक्षक दल यांचे देखरेखित पार पडली.दरम्यान वाघाला जास्त इजा होऊ नये याची काळजी घेण्यात आली.

१२ मे २०१५ रोजी उमरिखोरा (कक्ष क्रमांक ६३) टी १२६ वाघाची ब्रह्मा नामक टी १५८ वाघाशी क्षेत्र अधिकारावरून लढाई झाली.यात ब्रम्हा नामक वाघाचा मृत्यू झाला.या लढाईत छोटा मटका जखमी झाला.होता त्याला जखमा भरण्यासाठी निसर्गाच्या भरवशावर सोडण्यात आले होते. नाजिकच्या काळात त्याला शिकार करताना आणखी दुखापत झाली होती. त्याचा गंभीर दुखापतीत असल्याचा तो काही पर्यटकांना अढळला त्याचा तसा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता अशा स्थितीत त्याच्यावर उपचार करण्यासाठी अनेक वन्यजीव प्रेमींनी अनेक स्तरावरून मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर एन.टी.सी. ए. च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीच्या शिफारशींवरुन प्रधान मुख्य संरक्षक तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांनी जखमी वाघाला जेरबंद करण्यासाठी आदेश काढून मान्यता दिली.मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आवश्यक उपचारासाठी त्याला ट्राझित ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!