पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे व जिल्हा परिषद सदस्या सौ.सिमा सोरगे यांचे हस्ते लोणी येथील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
वरूड तालुका प्रतिनिधी✍️ निलेश निंबाळकर
☎️७७४३९०९५०७
अमरावती / वरूड : दिनांक २५ जून २०२१ रोजी लोणी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे व जिल्हा परिषद सदस्या सिमा सोरगे यांच्या हस्ते पार पडला. हा भूमिपूजन सोहळा पंचायत समिती सदस्य राजू पापडकर, पंचायत समिती सदस्य तुषार निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
संपन्न झालेल्या या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याची सुरुवात ओंकारेश्वर मंदिर पासून सुरु करण्यात आली. यात ओंकारेश्वर मंदिर ला वॉल कंपाउंड बांधणेकरिता ५ लक्ष रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती करणे व कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती करणे करिता १५ लक्ष रुपये, नागरी सुविधेअंतर्गत कॉंक्रीट रस्ता व कॉंक्रीट नाली व शेड बांधकाम करणे करिता २२ लक्ष ५० हजार रुपये, लोणी – पेठ (मांगरुळी) रस्ता सुधारणा करणेकरिता २० लक्ष रुपये, लोणी येथे धवलगिरी नदीवरील गाळ काढणे व खोलीकरण करणेकरिता ११ लक्ष १५ हजार रुपये, राजीव गांधी भवन बांधकाम करणेकरिता १० लक्ष रुपये, पशु वैद्यकीय दवाखाना दुरुस्ती करणेकरिता ३ लक्ष, अंगणवाडी केंद्र दुरुस्ती करणेकरिता २ लक्ष रुपये, दादाजी दरबार इत्तमगाव रोड जवळील विहीर दुरुस्ती करणेकरिता २ लक्ष रुपये, जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाउंड बांधणेकरिता ३ लक्ष रुपये, जिल्हा परिषद कन्या शाळेचे प्रवेशद्वार बांधकाम करणेकरिता १ लक्ष रुपये, वार्ड क्र.६ येथील अनु.जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणेकरिता ३ लक्ष रुपये, वार्ड क्र.२ येथील अनु.जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणेकरिता २ लक्ष ५० रुपये, समाज मंदिर सौंदर्यीकरण करणेकरिता १ लक्ष रुपये असा निधी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या सिमा सोरगे यांनी उपलब्ध करून दिला. या सर्व विकासकामांचा पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे व जिल्हा परिषद सदस्या सिमा सोरगे यांचे हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा यावेळी संपन्न झाला. लोणी येथील विविध विकासकामांकरिता पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या सिमा सोरगे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या सिमा सोरगे, पंचायत समिती सदस्य राजू पापडकर, पंचायत समिती सदस्य तुषार निकम, लोणी ग्रामपंचायतच्या सरपंचा अश्विनी दवंडे, उपसरपंच रवि तिखे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश गुल्हाने, प्रकाश सनेसर, ताराचंद फुटाणे, वनिता गडलिंग, आकाश पापडकर, उमा गुल्हाने, अरुणा धुर्वे तसेच डॉ.अरुण लोखंडे, सतिश पाटणकर, हैबत लोखंडे, गोपाल सोरगे, बबलू पावडे, स्वप्निल खांडेकर, सर्वेश ताथोडे, अमोल बोहरूपी, सुरेश बहातकर, प्रफुल गोहाड, धिरज धर्मे, वासुदेव तायवाडे, राधेश्याम मेंढे, सुरेंद्र ठाकरे, यश क्षिरसागर, तुषार लोखंडे, राजू लोखंडे, भूषण लोखंडे, प्रमोद सोनारे, वासुदेव कुबडे, स्वप्निल पोहरकर, विजय तायवाडे, शरद सालोडे, सुनिल वागद्रे, मुश्ताक सय्यद, प्रफुल तिखे, गोलू सायवाने, प्रल्हाद पाचघरे, राहुल सोरगे, घनश्याम सोरगे, निलेश सोरगे, अतुल गुल्हाने, सुभाष आगरकर, त्रिनयन मालपे तसेच लोणी येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.