पुरोगामी पत्रकार संघातर्फे पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

0
424

पुरोगामी पत्रकार संघातर्फे पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

बल्लारपूर प्रतिनिधी-पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने १५ वर्ष व त्यापेक्षा जास्त सतत गुणवत्ता पूर्वक सेवा केल्याबद्दल भारत सरकार द्वारा दिले जाणारे राष्ट्रपती पदक पुरस्कृत साहाय्यक फौजदार रमेश बर्डे,करोना काळात उत्कृष्ट सेवा,नक्षल प्रभावित क्षेत्रातील कठीण व दुर्गम भागात २ वर्षा पेक्षा जास्त सेवा केल्या बद्दल केंद्र शासनाच्या वतीने दिले जाणारे आंतरिक सेवा सुरक्षा पोलीस महासंचालक पदक पुरस्कृत सहाय्यक पोलीस निरीक्षक विनीत घागे,चंद्रपूर जिल्हा पोलिस दलात कोरोना काळात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय द्वारा दिले जाणारे प्रशस्ती पत्र पुरस्कृत ‘पोलीस योद्धा’ सहाय्यक फौजदार विजय मुक्के यांचा सन्मानचिन्ह देऊन पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे नुकताच गौरव करण्यात आला.
यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष राकेश सोमाणी,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख सुजय वाघमारे,बल्लारपूर तालुका अध्यक्ष प्रशांत रणदिवे,तालुका उपाध्यक्ष आरिफ शेख सरवर,तालुका सचिव शंकर महाकाली,तालुका कोशाध्यक्ष गौतम कांबळे,तालुका संपर्क प्रमुख अलोक साळवे,तालुका सहसचिव पराग गुंडेवार यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here