प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिचन योजनेसाठी लॉटरीद्वारे निवड कागदपत्रे अपलोड करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ..
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी अमोल मुसळे
उस्मानाबाद- प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म सिचन योजना ही2020/2021 ( ठिबक,तुषार) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी डीबीटी पोर्टलवर फॉर्म भरलेल्या शेतकऱ्यांमधून काही शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने 11519 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी 4321 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेले आहेत. उर्वरित 7198 लाभार्थी यांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत ते माहे जून अखेरपर्यंत कागदपत्रे अपलोड नाही केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा निवड झालेल्या शेतकऱ्यांनी जून 2021 अखेर तात्काळ कागदपत्रे अपलोड करावी,अपलोड न केलेल्या अन्यथा लाभार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यु. आर. घाटगे यांनी केले आहे.