वलांडी येथे रास्ता रोको राज्य मार्ग २३८ चे काम लवकर चालू करण्याची विविध संघटनांची मागणी
लातूर उपजिल्हा प्रतिनिधी/ लातूर
ओमकार सरदेशमुख – ९८२३३३१८५४ : देवणी / प्रतिनिधी : नव्याने तयार होत असलेल्या राज्य मार्ग क्रमांक. 238 निलंगा ते तोगरी चे बंद असलेले काम त्वरित सुरू करावे आणि जे काम झाले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून ते मोजमाप पुस्तिकेप्रमाणे झाले नाही म्हणून याची गुण नियंत्रक पथकामार्फत चौकशी करून अनेक वेळा याबाबत तक्रार देऊन ही याची दखल न घेणाऱ्या आणि गुत्तेदारास पाठीशी घालणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्य मार्ग क्रमांक २३८ या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आल्यामुळे रस्ता हा पुर्णपणे निसरडा झाला आहे. त्यावर अनेक दुचाकीवाले घसरून पडत आहेत आणि जखमी होत आहेत. पूर्ण रस्ता खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे. परिणामी अनेक अपघात होत असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे म्हणून दि. २३/६ रोजी वलांडी येथील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरू करावे , आणि आतापर्यंत झालेले रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून व मोजमाप पुस्तिकेप्रमाणे (एम.बी.) प्रमाणे झालेले नाही त्यामुळे या कामाची गुणनियंत्रक पथकामार्फत चौकशी करण्यात यावी आदी मागण्या साठी अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. या वेळी निलंगा- उदगीर, भालकी या रोडवर वाहतूक ठप्प झाली होती या रस्त्याचे काम लवकर चालू नाही केल्यास मुख्य अभियंता सा.बां.प्रादेशिक विभाग औरंगाबाद येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनात अन्याय अत्याचार,भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र, जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्था, स्वाभिमान युवा मंच,शिवबसव फाउंडेशन, ह.टिपू सुलतान विचार मंच, म.न.से.गणेश चवाळे, इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या.