परभणी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आयोजित केली पत्रकारांची महत्वपूर्ण बैठक ; पत्रकाराचे निवेदन
परभणी जिल्हा प्रतिनिधी- आरूणा शर्मा
परभणी जिल्हा माहिती कार्यालयातील अडचणींबाबत पत्रकारांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना निवेदन सादर केल्या नंतर जिल्हाधिकार्यांनी तात्काळ सर्व पत्रकारांची गुरुवारी २४ जून रोजी सकाळी ठीक ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.
परभणी जिल्हा माहिती कार्यालयात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील पत्रकारांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याकरिता परभणी शहरातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना निवेदन दिले .याची दखल घेत तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून गुरुवारी २४ जून रोजी पत्रकारांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात जिल्हा माहिती कार्यालयातून कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही, कार्यालयात वारंवार तोंडी तक्रार व सूचना देऊन शुद्धा, अडचणी दूर होत नाहीत. तसेच कित्येक दिवसांपासून जबाबदार अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकारी नियमित उपस्थित नसल्याने अडचणी सुटत नाहीत . समस्या वाढतच आहेत. त्यामुळे परभणी जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी वर्ग एक यांची नेमणूक करण्यात यावी, तसेच जिल्हा कार्यालयात माहिती अधिकारी वर्ग दोन नसल्याने दररोजच्या प्रेसनोट निघत नाही त्यामुळे माहिती अधिकाऱ्यांची पदे भरण्यात यावी. जिल्हा माहिती अधिकारी वर्ग एक उपलब्ध न झाल्यास नेमणूक केलेल्या प्रभारी अधिकाऱ्यास आठवड्यातून किमान तीन दिवस तरी कार्यालयात हजार राहण्याचे अनिवार्य करावे. दैनंदिन प्रसिद्धीपत्रक काढण्यात यावेत महत्वाचे अधिकारी मंत्री यांचे दौरे त्यांच्या प्रेसनोट काढण्यात येत नाही ते नियमितपणे माहिती देण्यात यावी प्रेस नोट दररोज काढण्यासाठी सक्तीचे करावे. तसेच जिल्ह्यातील पत्रकारांचे अधिस्वीकृती प्रकरणी पेन्शन प्रस्ताव ,आरोग्यविषयक प्रस्ताव नियमित अधिकारी उपस्थित नसल्याने ही प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने वेळेत पूर्तता होत नसल्याने पात्र असूनही पत्रकार लाभापासून वंचित राहत आहेत. या मागण्यांकरिता जिल्हाधिकारी साहेबांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीची तात्काळ दखल घेत गुरुवारी २४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ११ वाजता पत्रकारांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीस पत्रकारांनी उपस्थित राहावे अशी विनंती प्रा. सुरेश नाईकवाडे, सुरज कदम ,प्रवीण देशपांडे,विठ्ठलराव वडकुते, प्रभू दिपके, लक्ष्मण मानोलीकर, श्रीकांत देशमुख, मंचक खंदारे, नजीब सिद्दिकी, सय्यद खिझर, सुधाकर श्रीखंडे, राजू कर्डिले, राहुल घबाले दिलीप बनकर ,बाळू घिके, यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.