चिमूरला जिल्ह्यानिर्मिती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-आम.कीर्तिकुमार भांगडिया
शहिदस्मृतीदिन सोहळा
स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटुंबियासह,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
तालुका प्रतिनिधी
चिमूर.
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सर्वात जुनी मागणी असलेल्या नव्या चिमूर क्रांती जिल्ह्याची निर्मिती झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी आपण पूर्ण प्रामाणिकपणाने प्रयत्न करीत असून जिल्हानिर्मितीच्या दृष्टीने अनेक महत्वची कार्यालय निर्माण करून याची पायाभरणी केली आहे.भविष्यात या मागणीला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आपणप्रयत्न करणार असल्याचे मनोगत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी शहीदस्मृती दिन सोहळ्यात केले.
या वेळी मंचावर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते,जि. प.उपाध्यक्ष रेखा कारेकर,वसंत वारजूकर,नीलम राचलवार,श्यामजी हटवादे उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कीर्तिकुमार भांगडिया म्हनाले की या मागील साठ वर्षाच्या काळात या क्रांतिभूमीच्या विकासाला जेवठा निधी उपलब्ध झाला नाही त्या पेक्षा जास्त प्रमाणात मागील सहा वर्ष्याच्या काळात सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेरच्या श्वासापर्यंत क्रांतिभूमीच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केलं. सत्ताधाऱ्याकडून चिमूर अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय इतरत्र हलविण्याचा मध्यतरी प्रयत्न करण्यात आला होता पण याचा प्रखर विरोध करीत त्यांनी विरोधकानवर शरसंधान साधलं. चिमुरच्या अनेक मंजूर विकासकामात सत्ताधारी हस्तक्षेप करून निधी इतरत्र हलविण्याचा डाव करीत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत शैक्षणिक अडचणीत सर्वोतोपरी मदत करण्याच आश्वासनही त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिल.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या विकासकार्याचा गौरव करीत भविष्यात चिमूरच्या विकासाला सर्वोतोपरीने मदत करण्याच आश्वासन त्यांनी दिल. या वेंळी इतर मान्यवरानी चिमूर क्रांतीलढ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकीत मार्गदर्शन केलं.
कार्यक्रम प्रसंगी चिमूर क्रांतीलढ्यातील वीर शाहिदाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वतंत्र संग्राम सैनिकांच्या कुटुंबातील सदस्याचा व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलम राचलवार,संचालन विवेक कापसे तर आभार जयंत गौरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीच्या चिमूर तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.