वंचित बहुजन आघाडी तर्फे वाढत्या महागाईचा निषेध ..!
तहसील कार्यालय वरूड मार्फत लॉक डाउन काळात वाढत्या महागाईचा निषेध करुन प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना निवेदन
वरूड तालुका प्रतिनिधी✍️ निलेश निंबाळकर ☎️७७४३९०९५०७
अमरावती / वरूड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रिय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेशानुसार संपुर्ण राज्यभरात वाढत्या महागाईचा निषेध करुन प्रधानमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले..
वरुड येथे वंचित बहुजन आघाडीचे वतीने वरुड तहसील
कार्यालय समोर वाढत्या महागाईचा निषेध करून मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले..
निवेदन सादर करते वेळी वंचित बहुजन आघाडीचे अमरावती जिल्हा महासचिव सुशिल बेले ,अॅड. प्रदीप दुपारे , अशोक गडलिंग , अमर हरले, मुस्ताक शाह, नितेश डबरासे , राहूल लांडगे,अरविंद गाडगे, सद्दाम शाह,
राकेश गाठे,अनिकेत रामटेके ,रोशन गाठे,
नितेश ब्राम्हणे, आशिष लांडगे ,तेजस नागले सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.