वाढत्या महागाईला केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे आंदोलन..!
तालुका प्रतिनिधी✍🏻गुरूबचनसिंग जुनी
पांढरकवडा : मागील जवळपास दीड वर्षांपासून कोरोना महामारी व त्या अनुषंगाने लावलेली टाळेबंदी यामुळे व्यापारी, मध्यमवर्गीय, शेतकरी यांच्यासह सर्वांचे प्रचंड नुकसान व हाल झालेले आहे. हातावर पोट असणाऱ्या गोर-गरिबांची तर न भूतो न भविष्यती अशी वाईट परिस्थिती झाली आहे. ज्यांना ‘गंभीर’ कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला अश्या कुटुंबांची तर आर्थिक घडी पुर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अश्या परिस्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे. कच्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही आपल्यालाकरिता मात्र पेट्रोल-डिझेल खूप महाग झाले. डिझेल दरवाढीचा परिणाम स्वयंपाक घरातील वस्तुंच्या किमतीवर झाला. अत्यावश्यक असलेल्या घरगुती गॅस चे दर 850 रुपये इतके झाले आहे. आता गॅस सबसिडी नाममात्र उरली हे सगळ्यांना माहीतच आहे. मोठ्या थाटामाटात मोदी सरकारने ‘उज्वला’ योजनेचा प्रचार केला, २०१९ च्या निवडणुकीत महिलांची मतेही घेतली. आज खरच उज्वला योजना लाभार्थ्यांना हा महागडा गॅस परवडतो का? खाद्य तेलाचे दर ६ महिन्यात जवळपास दुप्पट झाले. फली तेल, सोयाबीन तेलाचे दर वाढण्यालाही आंतरराष्ट्रीय कारण आहे का? केंद्र सरकार ने खाद्यतेल जीवनावयशक वस्तुंच्या यादीतून काढून टाकल्याने साठेबाजी व नफेखोरी फोफावत आहे. तूर डाळ व इतर डाळींचे दर आवाक्याबाहेर गेले , अगदी चहापत्ती पासून स्वयंपाक घरातील बऱ्याच पदार्थांचे दर आकाशाला भिडले असल्याने प्रत्येकाचे घरगुती ‘बजेट’ अक्षरशः कोलमडले आहे. याचा सर्वात जास्त फटका गृहिणींना बसत असल्याने घर चालवतांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या महागाईच्या विरोधात निषेध करण्याकरिता पांढरकवडा तालुका कॉंग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने दिनांक २१/०६/२०२१ ला पांढरकवडा येथे तहसील कार्यालय समोर शाहिद बिरसा मुंडा यांना अभिवादन करून इंदिरा गांधी यांना अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मा.उपविभागीय अधिकारी केळापूर यांना निवेदन देण्यात आले.
• दे धक्का आंदोलन •
दे धक्का आंदोलनाचे नेतृत्व जितेंद्र शिवाजीराव मोघे ,विजय पाटील, अमर पाटील,मनोज भोयर,सिनु अण्णा नालमवार राज मिसेवार,इक्रम अली,बिशनसिग शिंदो, भैया ठमके,बाबू बैलीम, विष्णू राठोड,प्रेम राठोड,राजू तालकोकुलवार,निलेश उमरे,स्वामी सतगूनवार,हाफिज पोसवाल, शब्बीर बेग, मकरंद साने,जाकीर पोसवाल, अनिस पोसवाल,अनिल पुलजवार,सुनील गीरी, महेंद्र भोयर, बालू गोहणे,सुरेश अनमूलवार,अक्षय पारशावार,विपील चिंतावर,समीर चंदरने,स्वप्नील गौरवार,प्रफुल बोधनवार, साई रंगणेनिवार मजीद बैलीम, खालीक पटेल,शहेबाज खान,मुन्ना शेख व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते..