कोवीड केअर सेंटर्स मध्ये सुखद शुकशुकाट
प्रतिनीधी/ शेख तनवीर
यवतमाळ/पांढरकवडा : काही दिवसांपूर्वी बेड मिळविण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता.
परंतु आता कोरानाची दुसरी लाट ओसरू लागल्याने पांढरकवडाकरांना दिलासा मिळत आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात उभारणी केलेली 20 कोवीड केअर सेंटर रिकामे झाले आहेत.
कोरोना संकटाच्या पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वानाच भयभीत करून सोडले होते. जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ग्रामीण भागात २० कोवीड केअर सेंटर सुरू केले होते. यामध्ये जवळ पास १ हजार २०० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली होती. तथापि अनेक रूग्णांना कोरोनाचया वाढल्या संसर्गामध्ये बेड साठी वणवण भटकावे लागले होते. अशातच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरीच राहून उपचार घेतले.
अनेक अत्यवस्थ रुग्णांनी रुग्णालयाच्या पायरीवरच जीव सोडूला. परंतु गत काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने रुग्णांचे पॉझिटीव्हचे प्रमाण खाली आले असून बरे होण्याचे प्रमाणही बर्यापैकी आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध तालुक्यामध्ये सुरू केलेले २० कोवीड केअर सेंटर रिकामे झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या कोवीड सेंटर मधील संध्या संपूर्ण बेड रिकामे झाले आहेत. एकंदरीत पांढरकवडा तालुक्यातील रूग्णसंख्या हि आता झपाट्याने खाली गेली असून आरोग्य विभागानेही सुटकेचा नि:ष्वास सोडला आहे.