केंद्र सरकारच्या गॅस भाववाढीच्या निषेधार्थ मूल शहरात काँग्रेसचे निदर्शने व धरणे आंदोलन !

0
874

केंद्र सरकारच्या गॅस भाववाढीच्या निषेधार्थ मूल शहरात काँग्रेसचे निदर्शने व धरणे आंदोलन !

 

 

प्रतिनिधी✍🏻 किरण घाटे

चंद्रपूर /मूल- भारत देशावर अधिराज्य करीत असलेल्या भाजप प्रणित केंद्र सरकारने स्वयंपाक करणांऱ्या गॅस डिलेंडरचे दुप्पटीने भाव वाढ केल्याने देशातील गरीब व सर्वसाधारण कुटुंबियांचे कंबरडे मोडले आहे . केंद्र शासनाचे नेतृत्व करीत असलेल्या माेदी सरकारचा एका आंदाेलनातून मूल नगरीत काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यांत आला.भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे युवा नेते खासदार राहुलजी गांधी यांचा आज वाढदिवस हा संकल्प दिन म्हणून साजरा करण्यांत आला .याच दिनी (शनिवार दि. १९जूनला ) मूल तालुका व शहर कांग्रेस कमिटीच्या वतीने संजय गॅस एजन्सी समोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा जि. प.माजी अध्यक्ष संतोषशिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात मूल शहरात निषेध व धरणे आंदोलन करण्यांत आले .

मोदी सरकार हाय-हाय,वारे मोदी तेरा खेल-सस्ती दारू महेंगा तेल” मोदींच्या राज्यात-महिला गॅस असून काड्यासाठी महिला जंगलात” असे महिलांनी घाेषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला . केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजने अंतर्गत गरीब व आदिवासी बांधवांच्या प्रत्येक घरी गॅस दिली असून मोदी सरकारच्या कार्यकाळात गॅसची किंमत 350/- वरुन 830/ ते-900/- अशी (भाववाढ )केली आहे. तशीच 232 /-रुपये मिळणारी सबसिडी फक्त 36/- रु. केली. त्यामुळे महिलांना गॅस घेणे कठीण झाले अाहे .व प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक बजेट डबघाईस आले.

ग्रामीण भागातील उज्वला गॅस घेणाऱ्या गरीब महिलां जवळ सिलेंडर भरण्यासाठी 830/- रुपये नसल्याने स्वयंपाक कसा करावा या विवनचनेत त्या अडकल्या आहे . शेवटी इंधन म्हणून काड्या आणण्यासाठी त्यांना जंगलात जाणे भाग पडत आहे .त्यातही वाघाच्या हल्ल्यात बिचाऱ्या अनेक महिला मारल्या गेल्या ही वस्तुस्थिती आहे . यालाही केंद्र सरकारच जबाबदार असल्याने महिलांकडून केन्द्र सरकारचा या वेळी निषेध करण्यात आला . संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यांत आले. या आंदाेलनात प्रामुख्याने ममता रावत, नगर सेविका लीना फुलझेले, महिला कांग्रेसच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार,सिंगाडे, क्रीशना सुरमवार, यांचेसह कांग्रेसच्या महिला कार्यकर्त्या,तसेच तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, भेजगावचे सरपंच व बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, किसान सेलचे तालुका अध्यक्ष रुमदेव गोहणे, ग्रामीण कांग्रेसचे प्रमुख दीपक वाढई, युवक कांग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार, शहर कांग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश फुलझेले, संदीप मोहबे, महासचिव कैलास चलाख,संघटक, कोसंबी सरपंच रवी गिरडकर, गणेश रणदिवे, रणजित आकुलवार,कमलशिंह पटवा, सोनोशिंग पठवा, व कांग्रेसचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले हाेते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here