कृष्णापुर येथे कोविड लशीकरणाचा शुभारंभ
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे
अमरावती/ चांदूर बाजार (कृष्णापुर):- चांदुर बाजार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळवेल अंतर्गत येत असलेल्या कृष्णापुर येथे कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन गावचे पोलिस पाटील मोहन रेखे व सरपंच रूपाली रेखे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करोणा प्रतिबंधात्मक लस सर्वप्रथम गावचे पोलीस पाटील मोहन रेखे यांनी घेऊन शुभारंभ केला कोरोना प्रतिबंधात्मक लस मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. यावर्षी वरील सर्वच नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली. त्याच अनुषंगाने कृष्णापुर येथील जिल्हा परिषद शाळा येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. या लसीकरणा मध्ये १०० जणांनी लाभ घेतला यामध्ये महिलांनी सर्वात जास्त लाभ घेतला यावेळी सरपंच रूपालीताई रेखे उपसरपंच चंदा तंतरपाळे प्राथमिक आरोग्य केंद्र तळवेल येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीरज सवाई आरोग्य सेवक बिजवे, डोरले, आरोग्यसेविका साऊरकर मॅडम, तीखीले मॅडम, वाहन चालक नरेश मेटांगे, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश बोरखडे सर्व ग्रामपंचायत सदस्य या वेळी उपस्थित होते.