जिवती येथे नवीन विद्युत रोहित्र कार्यान्वित
जिवती प्रतिनिधी गोविंद वाघमारे
आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिवती येथे डीपीडीसी ओटीएसपी योजनेअंतर्गत काम झालेले १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र माजी जि.प.सदस्य गोदरु पाटील जुमनाके यांच्या हस्ते सुरु करण्यात आले.
या नवीन रोहित्रामुळे मारेवार चौक रोहित्राचे भार विभागले जावून दोन्ही रोहित्रावरील विषेशतः आदिवासी वस्तीतील नागरीकांना योग्य दाबाचा विजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
यावेळी जिवती नगर पंचायत अध्यक्षा पुष्पा नैताम,उपाध्यक्ष अशफाक पटेल,माजी नगराध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, मुख्याधिकारी कविता गायकवाड, लेखापाल कुर्हाडे तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड,कनिष्ठ अभियंता विक्की नागदेवे,कर्मचारी राहूल डांगे,व्यंकटी कऊडगावे,मीथुन गायकवाड,विनोद नगराळे इ उपस्थित होते.
विजेचे अपघात टाळण्यासाठी अधिकृत वीज जोडणी , विजेचा काटकसरीने वापर व वीज बिलाचा नियमितपणे भरणा करुन महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन राठोड यांनी केले