चंद्रपूरातील इंदिरानगर प्रभाग क्र. ३ मधील पुलाचे व सुरक्षा भिंतीचे बांधकाम तातडीने करा – मनसेची मागणी !
चंद्रपूर किरण घाटे विशेष प्रतिनिधी –
पावसाळ्याचे दिवस पाहता इंदिरानगर येथील वाहणाऱ्या नाल्याचे पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये जात असून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकतेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
जंगलपरिसरातुन येणारे पाणी येथील वार्ड क्रमांक ३ (वाल्मिकी ऋषी चौक )मधून इंदिरानगर प्रभागाच्या वस्तीतून वाहत जाते.त्यामुळे नाल्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या घरांना त्याचा धोका प्रत्येक वर्षी निर्माण हाेताे त्या आजूबाजूच्या घरांसाठी सुरक्षा भिंत व त्या मध्यभागी असणाऱ्या नाल्यावर ये जा करण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने नागरिकांच्या सोयीसाठी पक्क्या पुलाचे व सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात यावे यासाठी इंदिरानगर मनविसेचे विभाग अध्यक्ष तुषार येरणे यांच्या तर्फे मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच याची पाहणी करून पुलाचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे भेटी दरम्यान पदाधिका-यांना सांगितले जेणेकरून भविष्यात होणारा धोका टाळता येईल तदवतचं पावसाच्या पाण्यापासून आजूबाजूच्या घरांना सुरक्षा देता येईल यासाठी लवकरच इंदिरानगर प्रभाग क्रमांक तीन येथे पुलाचे बांधकाम व सुरक्षा भिंतीचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार, मनविसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, शहर उपाध्यक्ष पियुष धुपे, इस्माईल शेख, नामदेव सहारे, सचिन भंडारे, खेमराज ठाकरे, अमोल येरणे, प्रवीण वाडके, नयन सोनुने, नयन मेश्राम उपस्थित होते सदरहु नाल्याचे बांधकाम झाल्यास आजूबाजूच्या अनेक घरांना सुरक्षा मिळणार असून पावसापासून त्या घरांचा बचाव होणार आहे.
Home ईमपॅक्ट 24 न्यूज नेटवर्क चंद्रपूरातील इंदिरानगर प्रभाग क्र. ३ मधील पुलाचे व सुरक्षा भिंतीचे बांधकाम तातडीने...