कोविड१९ मुळे कुंकू पुसलेल्या राज्यातील महिलांचे आर्थिक दृष्ट्या पुनर्वसन करणार..! ज्योती ठाकरे..
प्रतिनिधी✍🏻ज्ञानेश्वर गायकर
अहमदनगर/संगमनेर :- कोरोना ची दुसरी लाट अत्यंत जीवघेणी ठरली असून, राज्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्या सर्व कुटुंबांना सावरण्याचे काम राज्य सरकार सर्वोत्तम महत्त्व देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या पुनर्वसन योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करू, असे महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी काल संगमनेर येथे सांगितले. त्या राहुरी येथे एका कार्यक्रमास जात असताना ,संगमनेर येथे ज्ञानेश्वर गायकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.गायकर व राहणे परिवार यांच्या विवाह निमित्त त्यांनी या दोन्ही परिवाराला औपचारिक भेट दिली.
राज्यात आम्ही मुंबई, ठाणे परिसरात या बाबत सर्वेक्षण केले असून ग्रामीण भागातील इतर जिल्ह्यात ही या बाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात अनेक बालके ही अनाथ झाली असून , त्यांचे ही योग्य ते संगोपन राज्य सरकार करणार आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या पुनर्वसन योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करू, यात राज्यातील उद्दोगपती , स्वयं सेवी संस्था यांना ही सामावून घेऊन योग्य नियोजन करू असे ही त्या म्हणाल्या. मी स्वतः राज्यात दौरा करणार असून लवकरच राज्य सरकार या बाबत उचित निर्णय घेईल. राज्यातील एका ही परिवाराला वाऱ्यावर सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील आधार या स्वयं सेवी संस्था बाबत त्यांनी अमोल शिंदे यांच्या कडून आढावा घेतला. महिला व बाल कल्याण बाबत ही संस्था राज्यात उत्तम काम करत आहे. अश्या संस्था ही आता या विषयावर पुढे येत असून ,योग्य नियोजन करून ,सर्वांना विश्वासात घेऊन आघाडी सरकार काम करत आहे, सर्व बाधित परिवारातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता आघाडी सरकार सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी त्यांनी संगमनेर येथील गंगा सृष्टी या प्रकल्पास भेट दिली.संगमनेर सारख्या ग्रामीण भागात जनतेचे राहणीमान उंचावणे बाबत त्यांनी गुंजाळ परिवाराचे कौतुक केले. नवं दांपत्यास त्यांनी शुभ आशिर्वाद ही दिले . या वेळी त्यांचे सोबत अफगाणिस्थान च्या मुंबई मधील राजदूत , भारताच्या मिसेस इंडिया , इंटरनॅशनल महिला संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. बाबासाहेब राहणे यांनी त्यांचे स्वागत केले.नामदेवराव गुंजाळ यांनी सत्कार सर्वांचा सत्कार केला.