वाघदरा येथे माझी पोषण परसबाग उपक्रम
कुपोषण मुक्ती साठी सेंद्रिय परसबागेची आवश्यकता उमेद चे प्रभाग कृषी व्यवस्थापक रवी चुनारकर यांचे आवाहन
गडचिरोली सुखसागर झाडे:-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नोती अभियान व्यवस्थापण कक्ष चामोर्शी अंतर्गत प्रभाग भेंडाळा अंतर्गत वाघदरा येथे माझी पोषण परसबाग उपक्रम अंतर्गत तालुका व्यवस्थापक विनोद बोबाटे , प्रभाग समन्व्यक एकनाथ सेलोटे यांच्या मार्गदर्शन खाली राणी दुर्गावती, माँ शारदा समुहाच्या सदस्य यांच्या घरी परसबाग बनविण्यात आली. गरोदर माता, किशोरवयीन मुली, व घरच्या जेवणात सेंद्रिय परसबाग मधील भाजीपाल्याचा वापर करून आपले आरोग्य सुदृढ, व पैशाची बचत करण्यासाठी घरच्या घरी परसबाग बनवून बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला रोजगार निर्मिती करू शकतो या साठी समुहाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन वयक्तिक, व सामूहिक परसबाग तयार करावे असे आवान प्रभाग कृषी व्यवस्थापक रवी चुनारकर यांनी केले या उपक्रम ला ctc सुषमा मलिक , icrp मोहुर्ले ताई पशु सखी गेडाम ताई , व ग्राम संघाचे अध्यक्ष , समूहाचे सदस्यांनी सहकार्य केले