फूटपाथ व्यवसायिकांना दहा हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार.

0
501

फूटपाथ व्यवसायिकांना दहा हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार.

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या पाठपुराव्याला यश, पत्राची घेतली दखल.

नगरपरिषदेच्या हद्दीतील पथविक्रेताना ‘ प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून दहा हजार रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार:

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

हिंगणघाट:-
कोरोनाविषाणूच्या संक्रमणामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील छोट्या-मोठ्या फूटपाथ व्यवसायिकांना आर्थिक फटका बसल्यामुळे त्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिले होते त्या पत्राची दखल घेत फुटपाट व्यवसायिकांना मदत मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग व अर्बन अफेअर्सच्या वतीने नगरपरिषदेच्या हद्दीतील फुटपाथवरील पथविक्रेत्यांना अर्थसहाय्य म्हणून खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी “प्रधानमंत्री स्वनिधी योजना” दिनांक 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वीचे पथविक्रेता यांच्यासाठी लागू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजना जून 2020 मध्ये कार्यान्वित केल्यामुळे फुटपाथ विक्रेता लाभार्थ्यांना दहा हजार रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी नगरपरिषद मधील ‘सुवर्णजयंती’ विभाग सोबत फुटपाथ विक्रेत्यांनी संपर्क साधावा.
कोरोनाच्या प्राधुर्भवाने लॉकडाउनच्या कालखंडा मध्ये फुटपाथवरील पथव्यवसायिकांना आर्थिक मंदीचा फटका प्रचंड प्रमाणात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ही योजना 1 जून 2020 ला सुरू करण्यात आली असून यामध्ये फळ विक्रेता, भाजीपाला विक्रेता, पानठेला, चहा टपरी, सलून, लॉन्ड्री ,अंडी ,रेडिमेट कापड, चप्पल ,स्टेशनरी पुस्तके, बांगड्या दुकानदार ,टोपली व्यवसाय करणारे बुरड़, खाद्यपदार्थ विक्रेता ,फुल विक्रेता, मटन दुकानदार, चाबी दुकानदार ,चप्पल जोडे बनविणारे मोची (चांभार), पेट्या ड्रम विकणारे ,सायकल भाड्याने देणारे, सायकल दुरुस्त करणारे, मोटर सायकल दुरुस्त करणारे, सोनार काम करणारे, भंगारवाले इत्यादी फूटपाथ दुकानदारांचा समावेश आहे सदर योजनेमध्ये लॉकडाऊन च्या कालखंडात फूटपाथ दुकानदारांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना खेळत्या भांडवलाची तात्पुरती गरज भागविण्यासाठी केंद्र सरकारने स्वनिधी योजना कार्यान्वित केली आहे त्यानुसार महाराष्ट्र सरकारच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांनी राज्यातील सर्व नगरपरिषदांना पत्र निर्गमित केलेली आहे. सदर योजनेचा लाभ घेताना जमानतदाराची अट नाही तसेच त्यांच्याकडे विक्री पत्र नसेल असेही ही पथविक्रेता पात्र असतील दिलेले भांडवल वर्षभरात नियमित परतफेड झाल्यास 7 टक्के व्याज अनुदान लाभार्थ्यांना मिळण्यास पात्र राहील व्याज अनुदान 31 मार्च 2022 पर्यंत मर्यादित राहील.
योजनेचा लाभ घेताना नगरपरिषद हद्दीतील सर्व पथ विक्रेता पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड ,राशन कार्ड, मतदान कार्ड ,डोमिसाईल प्रमाणपत्र ,बँक पासबुक, पॅन कार्ड ,ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास), बाजार फी वसुली पावती ,आधार लिंक मोबाइल नंबर ,एक पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे घेऊन ग्राहक सेवा केंद्र वेबसाईट द्वारे असे पत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी कळविले आहे.

(प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, खासदार शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांना दिले होते पत्र.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here