चंद्रपूरात कलावंतांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण !
चंद्रपूर -किरण घाटे विशेष प्रतिनिधी
कोरोना काळात व लॉकडाऊन कालावधीत कलावंतांवर माेठे संकट काेसळले हाेते .अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्यांचे कडे काेणीही लक्ष पुरविले नव्हते हे वास्तव आहे .त्यांची ही परिस्थिती बघता आज रविवार १३जूनला नागोराव पाटणकर बहुद्देशीय संस्था ( नागपूर )तथा चंद्रपूरच्या काही व्यक्तींकडून शहरातील जुनोना चौक जवळील बुद्ध विहारात कलावंताना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले .
या वेळी कार्यक्रमाचे आयोजक तथा आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध युवा गायक साहिल वागदे (भारती) राजेश चेडगुलवार ,मंगेश नगराळे, संगम शेरकर, श्रेयस वागदे ,सुजित चेडगुलवार आदीं उपस्थित हाेते .