महामार्ग प्राधिकरण सुस्त, राष्ट्रीय महामार्गावर खड्डे मस्त
लोकप्रतिनिधी व प्राधिकरणाचे दुर्लक्ष ;
वाहनधारकांना करावी लागते तारेवरची कसरत
कोरपना – तालुक्यातील आदिलाबाद – कोरपना – राजुरा – बामणी – आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्र ३५३ बी वरील गडचांदूर ते कोरपना दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.
सदर मार्ग राष्ट्रीय महामार्ग मधे रूपांतरित झाला असला तरी एखाद्या गावगाड्यातील रस्त्याची सद्यस्थिती त अवस्था आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यांमुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता कळायला वाहनधारकांना मार्ग नाही. याबाबत अनेकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला अवगत करू न ही केवळ डागडुजी पलीकडे कुठले ही काम आज गायत ठोस रित्या झाले नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होते आहे. तरी या अनुषंगाने आता तरी रस्त्याची दुरुस्ती करावी. अशी मागणी राजुरा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अड अरुण धोटे व कोरपना तालुका बार असोसिएशनचे सचिव अड श्रीनिवास मुसळे ,अड पुणेकर, अड येरणे, अड् मोहीतकर, अॅड.अर्पित धोटे, अड बोबाटे
यांनी निवेदनाद्वारे केली आहे.