सायली टाेपकरचा पुढाकार दुधारी ग्रा .प. कार्यालयात-अनेकांना सँनिटाँयझर व इम्युनिटी बुस्टरचे वितरण !
सांगली -✍🏻किरण घाटे विशेष प्रतिनिधी – : आज बुधवार दि.९ जूनला दुधारी ग्रामपंचायती मध्ये गोल्ड मेडल पुरस्कार विजेता तथा महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या नवाेदित सदस्या कु. सायली टोपकर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय ओबीसी सेलच्या वतीने आशा सेविका, अंगणवाडी सेविका व कोरोना योद्ध्यांना सॅनिटाँयझर व इम्मुनिटी बूस्टर चे वाटप करण्यात आले.
यावेळी इस्लामपूर शहर अध्यक्ष काँग्रेसचे राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष इस्लामपूर शहर काँग्रेसचे ॲड.आर .आर .पाटील ओबीसी सेल सांगलीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक तांदळे इस्लामपूर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असिफ जमादार प्रामुख्याने उपस्थित होते.
या शिवाय सरपंच अर्चना पोळ उपसरपंच दिपक लकेसर ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, सुशील सावंत, वसंत कुंभार, ज्ञानेश माने सरकार,सायली टोपकर, ग्रामसेवक अमर वाटेगावकर,अंगणवाडी सेविका आशा सेविका व इतर प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते.