मॅजिक बस इंडिया फौंडेशन गडचिरोली,”ग्रामीण पुनर्प्राप्ती” कार्यक्रम अन्तर्गत चामोर्शी तालुक्यातिल ६ गावात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
मॅजिक बस इंडिया फौंडेशन हि संस्था मागील १ वर्षापासून चामोर्शी तालुक्यातील जामगिरी,रेश्मिपुर्,प्रियदर्शनि, वायगाव,चांदेशवर, आंबोली, या गावात “ग्रामीण पुनर्प्राप्ती या कार्यक्रमा अंतर्गत लोकांना
उपजीविका मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्याच्या कुटुंबातील 11 ते 16 या वयोगटातील मुलांना खेळ हे माध्यम घेऊन जीवन कौशल्य विकास चे सत्र देण्यात येत आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावामध्ये विविध कार्यक्रम घेऊन जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. पर्यावरणाशि समंधीत,विविध घटक ,आणि समश्याकडे लक्ष वेधून त्याबद्दल जाग्रुकता निर्माण करणे,आणि महत्वाच्या बाबिविषयी तातडीने पाऊल उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू होता.
यामध्ये मुलांनी वृक्षाला राखी बांधून त्याच्या सुरक्षा करण्याची जिम्मेदारी घेतली,पर्यावरन विषयी मुलांनी आपले मनोगत साधर केतेत, मुलाची चित्रकला स्पर्धा घेण्यात आले.व वृक्षरोपण करुन हा दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला गावातिल सरपंच,अंगणवाडी सेविका आशा वर्कर,प्रतिष्ठित नागरिक युवक वर्ग उपस्थित होते.
सादर कार्यक्रम वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.प्रशांत लोखंडे सर व तालुका अधिकारी मा.देवेंद्र हिरापुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.नागेन्द्र नेवारे जीवन कौशल्य शिक्षक मा.आशिष मशाखेत्रि उपजीविका अधिकारी मा.कुरेकर मॅडम उपजीविका अधिकारी मा.अमर कांबळे गाव स्वयंसेवक मा सुशांत कोपलवार गाव स्वयंसेवक, तथा गावातील युवक वर्ग, प्रतिष्ठित नागरिक ,शाळकरी मुले यांनी सहकार्य केले..