चंद्रपूर -( किरण घाटे विशेष प्रतिनिधी )-गेल्या सात वर्षांपासून रिक्त असलेली RSI -RPI -R DYSPची 119 पदे लवकरात लवकर भरण्यात यावी या मागणीचे एक लेखी निवेदन आज मंगळवार दिनांक 08 जूनला पोलीस बॉईज असोसिएशन चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर तर्फे पोलीस महासंचालक यांना देण्यात आले. सदरहु निवेदन गृह पोलीस उपअधीक्षक भगत यांनी स्वीकारले.पाेलिस बाँईज असाेशिएशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रमाेद वाघमारे यांचे सुचनेच्या अनुषंगाने उपराेक्त मागणीचे निवेदन सादर करण्यांत आले असल्याचे पाेलिस बाँईज असाेशिएशनच्या एका पदाधिका-यांने सांगितले .दरम्यान आज निवेदन सादर करतांना पोलीस बॉईज असोसिएशनचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे ,जिल्हा उपाध्यक्ष साहिल मढावी ,जिल्हा संघटक सद्दाम अन्सारी कार्यकारी अध्यक्ष राकेश काकोडे शहराध्यक्ष देविदास बोबडे शहर उपाध्यक्ष बशीरभाई अन्सारी जिल्हा सचिव संजय खोब्रागडे विधी सल्लागार ऍड. आशिष नगराळे महिला आघाडी संघटिका मंथना नन्नावरे सहसंघटिका रितू शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते..