ब्रम्हपुरी शहर शिवसेनेकडून कर्नाटक भाजप सरकारचा जाहीर निषेध!
कन्नड रक्षक गुंडाकडून सिमावासियांवर नेहमी अन्याय होत होते. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनीही सीमा बांधवांवर अन्याय केले. त्यास कोल्हापुरातील शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले आहे. आता मात्र कर्नाटक सरकारने हद्द पार केली असून, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, यांना सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. या घटनेचा निषेध करीत काल 9 ऑगस्टला झांशी राणी चौक , ब्रम्हपुरी येथे शहर शिवसेनेने वतीने कर्नाटकी सरकारच निषेध केला या ठिकाणी “जय भवानी जय शिवाजी”, “कर्नाटक सरकारचा धिक्कार असो”, “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही” अशा निषेधाच्या घोषणा देत झांशी राणी चौक परिसर दणाणून सोडला.
यावेळेस शहर प्रमुख नरूभाऊ नरड, माजी तालुका प्रमुख नरेंद्र भाऊ गडगिलवार, खुर्शीद अली शेख विध्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख,तालुका संघटक रिंकुंभाऊ पठाण, युवा सेना शहर प्रमुख अमोल माकोडे, युवा सेना उपशहर प्रमुख आशिष गाडंलेवार, विद्यर्थी सेना तालुका प्रमुख निलय पातकर, चेतन गुणजेकर, निकेतन गुणजेकर, पवन सोनवाणे, वैभव सूर्यवंशी, लोकेश अंबादे, सुभाष ताजने, अण्णा बिटकर व शिवसैनिक उपस्थित होते.