शेतकऱ्यांच्या बांधावर थेट मजुरांची कोरोना अँन्टीजन तपासणी, मदनापुर ग्रामपंचायतीचा उपक्रम
रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची तपासणी
तालुका प्रतिनिधी / चिमूर : कोरोना आजाराच्या संसर्गाने सगळीकडे थैमान घालले आहे. दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात आजाराने शिरकाव केला. रुग्णसंख्या वाढत जात आहे. त्यामुळे कोरोना आजारावर वेळीत उपचार व्हावा म्हणून कोरोना रॅपिड ॲन्टीजन तपासणी चे शिबीर रोजगार हमीच्या मजुरांची तपासणी थेट शेतकऱ्याच्या बांधावर करण्यात आली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात रौद्ररूप धारण केले आहे. त्याचबरोबर शासनाने तिसऱ्या लाटेची पुर्वकल्पना सर्व प्रशासनाला दिली आहे. ग्रामीण भागातील परिसरातील गावात पहील्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाने अनेक रुग्ण दगावले. कोरोना आजाराचे लवकर निदान व उपचार व्हावा. ग्रामीण भागातील शेत मशागतीचे कामे काही दिवसावर येवुन ठेपले आहे. त्यामुळे मासळ बु गावातील कोरोना हद्दपार करन्यासाठी थेट ग्रामपंचायत मदनापुरने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरांची तपासणी बोडी खोलीकरण सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर ग्राम पंचायत मदनापुरच्या वतीने करण्यात आली. तपासणी कण्यासाठी पुरुष, महिलां मजुरांची मोठया प्रमाणात उपस्थित होती. मजुरांनी तपासणी शिबीरासाठी उसर्फुत प्रतिसाद दिला.
यावेळी मदनापुर ग्रामपंचायतचे सचिव केशव गजभे, रॅपिड ॲन्टीजन टेस्टींग सेंटर चिमूर च्या टिमचे आरोग्य सेवक प्रदिप बन्सोड, किशोर नवघरे,माणिक भोंडे, आरोग्य सेविका प्रणिता पिसे,प्रेमीला बोरकुटे, तलाठी अनिल वाघमारे,रोजगार सेवक किशोर मगरे, मोरेश्वर डुमरे माजी ग्रामपंचायत सदस्य हे यावेळी उपस्थित होते.