नागपूरच्या शक्ती माता नगर महिला समितीचा उपक्रम ! आँनलाईन डाँन्स स्पर्धेत विदर्भातील मुलींनी घेतला सहभाग ! 

0
773

   कविता रेवतकर व चित्रा माकडेंचा पुढाकार !

 

नागपूर.✍🏻 किरण घाटे विशेष प्रतिनिधी – : नागपूर शक्ती माता नगर महिला समिती द्वारे लॉकडाऊनच्या काळात मुलां-मुलींच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या हेतूने ऑनलाइन डाँन्स स्पर्धा आयोजीत करण्यात आलेली होती. ह्या स्पर्धेत विदर्भातील बच्चा कंपनीने मोठ्या संख्येने आपला सहभाग नाेंदविला.व त्यांनी नाविण्यपूर्ण नृत्याविष्कार करून स्पर्धेसाठी (आयाेजकांकडे ) व्हीडिओ पाठवलेत.

पालकांनी सुद्धा उत्साहपूर्वक आपल्या पाल्यांकडून ह्या स्पर्धेसाठी तयारी करून घेतली

हाेती.

शक्ती माता नगर महिला समिती द्वारे घेण्यात आलेली ही स्पर्धा ऑनलाइन असल्यामुळे तसेच वयाचे कुठलेही बंधन नसल्यामुळे अनेक मुला मुलींनी आपला यात सहभाग नाेंदविला .या स्पर्धेमुळे घरात कोंडून असलेल्या व कंटाळलेल्या मुला मुलीं मध्ये एकप्रकारचा उत्साह संचारला हाेता.सदरहु

स्पर्धेत सात ते दहा वयोगटा मध्ये प्रथम क्रमांक हिरण्या चरडे,

द्वितीय क्रमांक _रित हटेकर,

तृतीय क्रमांक__मयुरी देशकर यांनी पटकाविला तर

इतर वेगवेगळ्या वयोगटात

ओजस्वी डॉ.नीतीन फटींग

कस्तीजा माकडे

परी गोरख

श्रावणी गोरडे

यांनी प्रथम क्रमांक पटकविला .

 

आयोजित केलेल्या या उपक्रमास शक्ती माता नगर हनुमान मंदिरचे अध्यक्ष हेमंत सेलोकर, सचिव देवदास देवतळे वर्षा मेंढे , समीता चकाेले यांनी प्रोत्साहित केले.

 

सदरहु स्पर्धा यशस्वी करण्यांस शक्ती माता नगर महिला समितीच्या अध्यक्षा कविता रेवतकर व सचिव चित्रा माकडे यांनी अथक परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here