टेंभूरखेडा येथील कोविड विलगीकरण कक्षास सभापती विक्रम ठाकरे यांची भेट

0
782

वरूड तालुका प्रतिनिधी ✍🏻निलेश निंबाळकर
☎️ .७७४३९०९५०७

अमरावती / वरूड : जिल्हा परिषद शाळा, टेंभूरखेडा येथील ग्रामपंचायत द्वारा सुरू करण्यात आलेल्या कोविड विलगीकरण कक्षास आज पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांनी भेट दिली. कोरोना आटोकात आणण्यासाठी कोविड विलगीकरण कक्ष स्थापन केल्याबद्दल व विलगीकरण कक्षात उत्तम व्यवस्था केल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

यावेळी पंचायत समिती सदस्या ललिता लांडगे, ग्रामपंचायत टेंभूरखेडा च्या सरपंचा रोषणा निंभोरकर, उपसरपंच राजेंद्र सोनूले, ग्रामपंचायत सचिव सतीश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य सचिन वानखडे, प्रज्ञा लांडगे, मुकेश देशमुख, अशोक पंडागळे, प्रदिप पवार, पवन ठाकरे तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here