प्रतिनिधी/बाबूराव बोरोळे
लातूर :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेंद , साकोळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना , ग्रामपंचायत कार्यालय , कांबळगा व इतर ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , जिल्हा परिषद कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे , यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला या उपक्रमात शेंद येथील तरुणांनी सहभाग घेतला होता . वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार या गावाचा महिला सरपंच वैशाली परबत यांनी केला . तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे . यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबवण्यात आले , मात्र त्याचा परिणाम झाला नाही , आणि एकदा वृक्षरोपण केल्यानंतर काही दिवसात हे वृक्ष नष्ट होत होती .व त्यांची वाढ न झाल्याने वृक्षलागवड करून फायदा होत नव्हता हे आज सरकारने आता वृक्ष लागवड करून त्याची निगा राखण्याची जबाबदारी यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे , विस्तार अधिकारी व्होट्टे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील , सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक पंडित शिंदे , ग्रामसेवक अनिल जाधव , लिंबराज माने , आदी उपस्थित होते .