Home चंद्रपूर घुग्घुस येथील सेवा मार्ग, नाली बनवा – सभापती रोशन पचारे

घुग्घुस येथील सेवा मार्ग, नाली बनवा – सभापती रोशन पचारे

0
63

घुग्घुस येथील सेवा मार्ग, नाली बनवा – सभापती रोशन पचारे

 

घुग्घुस शहरातील बसस्थानक मुख्य रस्ता चंद्रपूर रोडवरील वियाणी शाळा तसेच वणी रोडवरील बोंमले पेट्रोल पंप रस्त्यावरील सेवा मार्ग तसेच नालीचे बांधकाम करण्यात यावे.

 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, घुग्घुस शहरामध्ये मुख्य रस्त्याच्या बाजुला सेवा रोड व नालीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे घुग्घुस शहरातील नागरीकांना वाहतूक करण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे तसेच रस्त्याच्या बाजुला नाली नसल्याने पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होत असल्याने रस्ता खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याअनुषंगाने, घुग्घुस शहरातील नागरिकांचा विचार करता वियानी शाळा ते बोंबले पेट्रोल पंप पर्यंत सेवा रोड व नालीचे बांधकाम लवकरात लवकर करून देण्यात यावे.

अशी मागणी निवेदनातून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे करण्यात आली असुन खासदार प्रतिभा धानोरकर, पालकमंत्री मा.अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार तसेच पांढरकवडा विधानसभा राजु तोडसाम,मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

मा.सार्वजनिक बांधकाम व शिक्षण व क्रिडा विभाग मा.श्री. रोशन परशुराम पचारे यांनी कामाची जोरदार मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!