आपल्या शैक्षणिक हक्कांसाठी लढा, उत्तम दर्जेदार शिक्षणासाठी झटू – NSUI चा विद्यार्थिनींशी संवाद
चामोर्शी, सुखसागर झाडे :– नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया* (NSUI)च्या वतीने शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय, चामोर्शी येथे विद्यार्थिनींशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रम NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः कमवा व शिका योजनेअंतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मानधन, वस्तीगृहातील मासिक भत्ता तसेच महाविद्यालयातील विविध अडचणी याबाबत विद्यार्थिनींनी आपले प्रश्न मांडले. NSUI च्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत प्रशासनाकडे मांडण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विद्यार्थिनींना शैक्षणिक व NSUI युनिट टीम च्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्वातंत्र्य फेलोशिप देण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करणार आहे. “विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी निःसंकोचपणे आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात.
त्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष अमित किनेकर, उपाध्यक्ष आयुष पाल यांच्यासह युनिट टीममधील कोमल कोवे, तमन्ना पठाण,खुशबू हजारे,आदित्य कोळापे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.









