Home गडचिरोली उमेद ची मिळाली साथ एकल महिलेनी धरली उद्योगाची कास

उमेद ची मिळाली साथ एकल महिलेनी धरली उद्योगाची कास

0
65

उमेद ची मिळाली साथ एकल महिलेनी धरली उद्योगाची कास

पंचायत समिती प्रांगणात गटविकास अधिकारी यांच्या शुभहस्ते शरबत स्टॉलचे उदघाटन

चामोर्शी, सुखसागर झाडे :- आज पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत वालसरा येथील रहिवासी श्रीमती लता सुरेश मेश्राम या एकल महिला भगिनीस पंचायत समिती आवारात सरबत स्टॉलचे उदघाटन सोहळा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
शरबत स्टॉल उभारण्यासाठी या होतकरू एकल महिलेस महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान “उमेद”च्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये लिंबू सरबत, आवळा सरबत, अंबाडी सरबत, कैरीचे पन्हे, ताक इत्यादी सरबताचे/ पेयाचे प्रकार उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले आहे.
आज पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
बहुतांश यापूर्वी उपजीविकेसाठी वाटेल ती मेहनत, त्याचप्रमाणे हंगामी रोजगारा करिता या भगिनींना मिरची तोडणीसाठी आंध्र प्रदेशात स्थलांतर करावे लागत होते; मात्र या उपक्रमामुळे त्यांना आता आपल्या गावातच सन्मानाने रोजगार उपलब्ध झाला आहे.
या उपक्रमातून एकल महिलांना स्वावलंबी बनविण्याचा संदेश देण्यात आला असून, त्यांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा भगिनींना साथ दिल्यास त्यांच्या सन्मानाने जगण्याच्या प्रवासाला अधिक बळ मिळेल. अशी भावना यावेळेस उपस्थितांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!