Home गडचिरोली खाजगी ट्रॅव्हल व स्कॉर्पिओ चा भीषण अपघात, चार ठार, १२ गंभीर जखमी,...

खाजगी ट्रॅव्हल व स्कॉर्पिओ चा भीषण अपघात, चार ठार, १२ गंभीर जखमी, तळोधी मो. जवळील घटना

0
232

खाजगी ट्रॅव्हल व स्कॉर्पिओ चा भीषण अपघात, चार ठार, १२ गंभीर जखमी, तळोधी मो. जवळील घटना

 

चामोर्शी, सुखसागर झाडे :- स्कार्पिओ ने रामपूर येथील लग्न आटोपून भाडभिडी कडे वरात घेऊन जात असताना तळोधी जवळ स्कॉर्पिओ व ट्रव्हलची एकमेकाची जब्बर धडकेत . चार जण जागीच ठार तर १२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ताकोधी हायवेवर घडली

कुरुड रामपूर वरून स्कॉर्पिओ mh ४६, पी,५३९२ ने १६ लग्नाचे प्रवासी घेऊन भाडभिडी मो येथे जात असताना गडचिरोली कडून प्रवीण टुर्स अँड ट्रॅव्हल क्रमांक mh १५ CK ५००५ ने प्रवासी घेऊन येत असताना तलोधी जवळील नवीन पेट्रोल पंप समोर हायवेवर समोरा समोर जब्बर धडकेत स्कॉर्पिओ मधील वऱ्हाडी पैकी विमल कान्हुजी गव्हारे कुणघडा, सुमन देवाजी गव्हारे कुणघडा, अनिकेत साईनाथ बरलावार भडभीडी मो., आरोही मोगरकर वय.०८ वर्ष गट्टेगुडा हे चार जण ठार झाले तर. जखमी मध्ये प्रतिमा रतन मोगरकर ३५ वर्षू , गुरुदेव चूरकुट कुणघाडकर ५५ वर्ष भाडभिडी, निखिल जराते वय १७ भडभीडी, संजय नागेश्वर वैरागडे वय १७ भडभुडी, कुणाल श्रावण कन्नाके21 , सुधाकर कुंनघडकर वय ६५ भाडभिडी, अमर सखाराम चलाख वय ५७ जुनोना , देवाजी गोमाजी गव्हारेवय ६५ कुण घडा, रेखा अमर चलाख वय ५५ जुनोना, वेदांत संजय वैरागडे वय १६ भडभीडी , करण कुमरे वय १६ वर्ष भडभीडी ड्रायव्हर गुरुदास वासेकर असे १२ जनाला डोक्याला जब्बर मार बसल्याने गंभीर जखमी झाले त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना गडचिरोली सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रवीण कुमार कीलनाके यांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. नि. बनसोडे यांनी आपल्या चमूसह तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचांसमक्ष मोका चौकशी तथा पंचनामा करीत पोलीस यंत्रणेमार्फत पुढील सखोल तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!