Home चंद्रपूर युवा मोर्च्याचा कार्यकर्ता म्हणजे परिवर्तनाचा शिल्पकार – आ. किशोर जोरगेवार

युवा मोर्च्याचा कार्यकर्ता म्हणजे परिवर्तनाचा शिल्पकार – आ. किशोर जोरगेवार

0
74

युवा मोर्च्याचा कार्यकर्ता म्हणजे परिवर्तनाचा शिल्पकार – आ. किशोर जोरगेवार

युवा मोर्चा बैठक ; पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया गतीने राबविण्याचे आवाहन

मजबूत संघटन हेच आपल्या यशाचे गमक आहे. प्रत्येक बूथपर्यंत पक्षाची ताकद पोहोचवणे आणि प्रत्येक घरापर्यंत आपली विचारधारा नेणे हे काम युवकांनीच जोमाने करायचे आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. लोकशाही मजबूत करायची असेल, तर सुशिक्षित आणि जागरूक मतदार तयार होणे आवश्यक आहे. यात युवा मोर्चाने अग्रस्थानी राहून काम करावे, असे आवाहन करत युवा मोर्च्याचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे परिवर्तनाचा शिल्पकार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
शनिवारी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या कार्यालयात युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली तसेच मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार तथा नागपूर विभाग पदवीधर नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे, नागपूर विभाग पदवीधर नोंदणी सहप्रमुख सुधीर दिवे, माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहूले, महामंत्री रवी गुरनुले, मनोज पाल, मनपा गटनेते शेखर शेट्टी, वंदना हातगावकर, दशरथ सिंग ठाकूर, स्वप्नील डुकरे, विनोद खेवले, सायली तोंडरे, नगरसेवक आशिष मासीरकर, प्रसाद जोरगेवार, सुमित बेले, ओमेश आयलू, प्रलय म्हशाखेत्री, निलेश बेलखेडे, आशिष वाढई आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजची बैठक ही केवळ संघटनात्मक बैठक नसून भविष्यातील भारत घडविणाऱ्या युवकांच्या शक्तीला दिशा देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय जनता पार्टी हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो विचारांचा, संस्कारांचा आणि राष्ट्रसेवेचा एक व्यापक परिवार आहे. या परिवारात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवक म्हणजे ऊर्जा, उत्साह आणि परिवर्तनाची ताकद आहे. देशाच्या प्रत्येक मोठ्या परिवर्तनामागे युवकांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आज आपण संघटनात्मक बळकटीकरणाबाबत चर्चा केली.
पदवीधर मतदार नोंदणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. लोकशाही मजबूत करायची असेल, तर सुशिक्षित आणि जागरूक मतदार तयार होणे आवश्यक आहे. पदवीधर युवकांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला, तर निश्चितच समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. प्रत्येकाने आपल्या परिसरातील पदवीधर युवकांपर्यंत पोहोचावे, त्यांना मतदार नोंदणीचे महत्त्व पटवून द्यावे आणि या प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे.
आजचा युवक केवळ स्वतःच्या भविष्याचा विचार करत नाही, तर देशाच्या भवितव्याची जबाबदारीही उचलतो. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने नेहमीच युवकांना संधी दिली आहे आणि त्यांना नेतृत्व दिले आहे. आपल्या कार्यातून, समर्पणातून आणि प्रामाणिक प्रयत्नांतून समाजात सकारात्मक संदेश देण्याची गरज आहे. “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या तत्वावर चालत आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे, असे ते म्हणाले. या बैठकीला युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!