Home चंद्रपूर ‘इरई नदीचे खोलीकरण’ निव्वळ पैसे कमविण्याचा धंदा – सुनिल मुसळे

‘इरई नदीचे खोलीकरण’ निव्वळ पैसे कमविण्याचा धंदा – सुनिल मुसळे

0
68

‘इरई नदीचे खोलीकरण’ निव्वळ पैसे कमविण्याचा धंदा – सुनिल मुसळे

आम आदमी पार्टीने आरोप केला आहे की इराई नदीचे खोलीकरण करणे हा निव्वळ सत्ताधारी आणी कंत्राटदाराचा पैसे कमविण्याचा धंदा बनला आहे. या नदीचे आधीच 5 वेळा खोलीकरण झाले आहे, तरीही पुन्हा पुन्हा हे काम केले जात आहे.

आम आदमी पार्टीचे प्रदेश जॉईंट सेक्रेटरी सुनिल मुसळे म्हणाले, “इराई नदीचे खोलीकरण केल्याने पाणी साठवण क्षमता वाढते, पाण्याचा वेग कमी होतो आणि बाढ़ नियंत्रणात राहते. पण हे काम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू न करता हिवाळ्यात करायला पाहिजे. व युद्ध पातळीवर करायला पाहिजे होते .यात हे काम फक्त पैसे कमविण्यासाठी केले जात आहे. दरवर्षी मे महिन्यात खोलीकरण केले जाते आणि जून महिन्यात पाऊस येतो, त्यामुळे पावसाळ्यात मोजमाप चुकीचे पद्धतीने होते व अवाच्या सव्वा पैशाचे बिल बनविले जाते आणि खोलीकरणाचे पैसे राजकारणी आणि ठेकेदाराच्या घशात जाते. याचा जनतेला काही फायदा होत नाही, उलट जनतेची फसवणूक होत आहे.”

आम आदमी पार्टीने मागणी केली आहे की हे काम पारदर्शकपणे व्हावे आणि पैसे योग्य प्रकारे खर्च व्हावेत. आम्ही मागणी करतो की खोलीकरणाचे काम पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात करावे आणि मोजमाप योग्य पद्धतीने व्हावे.

आम आदमी पार्टी हे काम पारदर्शकपणे व्हावे आणि पैसे योग्य प्रकारे खर्च व्हावेत यासाठी जनतेला सोबत घेऊन संघर्ष करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!