Home चंद्रपूर हॉटेल व खाद्यपदार्थाच्या दुकानात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर!

हॉटेल व खाद्यपदार्थाच्या दुकानात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर!

0
87

हॉटेल व खाद्यपदार्थाच्या दुकानात घरगुती गॅसचा अवैधरित्या वापर!

घुग्घूस :- इस्रायल-अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठ्याच्या मुळावर घाव बसला असून त्याचे परिणाम ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांवर पडू लागले आहे. अमेरिका इस्रायल इराण यांच्यातील संघर्षाचे पडसाद आखाती देशामध्ये उमटत असल्यामुळे गैसपुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. घुग्घूस शहरात एलपीजी सिलेंडर चा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. टंचाई दुर करण्यासाठी प्रशासनाने व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे वितरण बंद केले आहे त्यामुळे काही हॉटेल, आणि खाद्यपदार्थाचे विक्रेते सर्रास घरघुती गैस सिलेंडरचा वापर करीत आहे. मात्र नागरिक घरघुती गैस उपलब्ध होत नसल्याने धावपळ करीत आहे. तर चायनीज,चहा टपरी, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा व्यावसायिक या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा (14.2 kg) अवैधरित्या वापर करणे सुरु असून ते बेकायदेशीर आणि धोक्याचे आहे. हे आवश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन असून, अशा कृत्यांवर प्रशासनाकडून धाडी टाकून सिलेंडर जप्त करणे, दंड ठोठावणे आणि अवैधरित्या वापर करणाऱ्या व्यवसायिकावर व हॉटेल मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.घरी स्वयंपाक करण्यासाठी घरगुती सिलेंडर मिळत नसताना हॉटेल मालकांनकडे घरघुती सिलेंडर उपलब्ध कसा असा प्रश्न निर्माण होत आहे.

मोठमोठ्या शहरात विविध ठिकाणी प्रशासन हॉटेलवर धाडी टाकून घरगुती सिलेंडर जप्त करत आहे आणि मालकांवर गुन्हे दाखल करत आहे.मात्र घुग्घूस सारख्या ठिकाणी सर्रासपणे घरघुती सिलेंडर चा वापर होत असताना कायदेशीर कारवाई का करण्यात येत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.घरगुती गॅस सबसिडीयुक्त असतो आणि तो फक्त घरगुती वापरासाठी आहे. हॉटेलमध्ये व्यावसायिक वापरासाठी फक्त (19 kg) व्यावसायिक सिलेंडर वापरणे अनिवार्य आहे. व्यावसायिक किचनमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. अशा कृत्यांबद्दल मोठा आर्थिक दंड आणि काही प्रकरणांमध्ये अटकही होऊ शकते.
हॉटेल व्यवसायिकांनी नियमांचे पालन करावे आणि व्यावसायिक सिलेंडरचाच वापर करावा असा नियम असताना सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे घरघुती सिलेंडर चा वापर होत असताना दिसत आहे.
बसस्थानक परिसर,गल्लीबोळीत विविध ठिकाणी असलेले चायनीज दुकान व चहा टपरी तसेच रेस्टॉरंट व हॉटेलवर पुरवठा अधिकारी यांनी धाड टाकून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांत जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!