Home चंद्रपूर अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

0
130

अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

घुग्घूस :- घुग्घूस येथून पाच किमी अंतरावर असलेल्या शेणगाव गावातील एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 27 मार्च ला सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलाचे नाव अनिकेत अमोल बोबडे वय (17) वर्ष असे आहे.

माहितीनुसार अनिकेत अमोल बोबडे वय (17) वर्ष रा. शेणगाव हा पहाटे घरून बाहेर गेला. परंतु बराच वेळ होऊन सुद्धा घरी परत आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला असता त्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. वृत लिहीपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून घटनेचा पुढील तपास घुग्घूस पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!