आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वी
गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून 14 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. गडचिरोली पोलीस दल व सर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मा. दंतेश्वरी रुग्णालय, चातगाव येथे दिनांक 21 मार्च 2026 रोजी “प्रोजेक्ट संजीवनी” अंतर्गत ही शस्त्रक्रिया पार पडली.
यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण केलेले 13 व गोंदिया जिल्ह्यातील 1 अशा एकूण 14 सदस्यांचा समावेश होता. आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने एकूण 50 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मुख्य प्रवाहात पुनर्स्थापना व सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य अधिक सुखकर व्हावे, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे वारे वाहवे त्यांच्या वेलीला नवं फुल उमालावे जीवनात नवचैतन्यमय वातावरण निर्माण व्हावे. यासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध आहे.









