Home गडचिरोली दोन मालवाहतूक ट्रकची आमने सामने जोरदार टक्कर

दोन मालवाहतूक ट्रकची आमने सामने जोरदार टक्कर

0
258

दोन मालवाहतूक ट्रकची आमने सामने जोरदार टक्कर

अपघातात एक ट्रक वाहक किरकोळ जखमी दुसरा पसार

ट्रक चे मोठे नुकसान मात्र सुदैवाने जीवितहानी टळली पोहर नदी पुलाजवळील घटना

चामोर्शी, सुखसागर झाडे :- दोन मालवाहतूक ट्रकने एकमेकाला जब्बर धडक दिल्याने त्यात दोन्ही ट्रकचे पुढील भाग चक्कनाचुर होत दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झालेत्यात चालक वाहक किरकोळ जखमी ही घटना आज दुपारी पोहर नदी पुलाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मालवाहतूक ट्रक न.CG07-DC 8925 हा मालवाहतूक ट्रक सुरजागड येथून रायपूर कडे व्हाया चामोर्शी मार्गे जात होता तर दुसरा मालवाहतूक ट्रक न
CG -04/QJ2 403हा मालवाहतूक ट्रक गडचिरोली मार्गे येत येत असताना तळोधी जवळ असलेल्या पोहर नदी पुलाजवळ येताच अंदाज चुकल्याने दोन्ही ट्रकची टक्कर झाल्याने दोन्ही ट्रकचे नुकसान झाले असून चालक वाहक किरकोळ जखमी झाला आहे.
ट्रक. न 2403 चा चालक फरार झाला असल्याचे माहिती समोर आली असून दुसरा ट्रकचा चालक घटनास्थळीच असून त्या ट्रकच्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान चामोर्शी पोलिस घटनास्थळी दाखल होत त्या ट्रकला हटवण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!