Home गडचिरोली नक्षल्यानी उभारलेली स्मारके पोलिसांनी केली उद्धवस्त

नक्षल्यानी उभारलेली स्मारके पोलिसांनी केली उद्धवस्त

0
291

नक्षल्यानी उभारलेली स्मारके पोलिसांनी केली उद्धवस्त

गडचिरोली : सुखसागर झाडे

शहीद सप्ताह व अन्य वेळी दुर्गम भागातील जंगलात नक्षल्यांनी उभारलेली ४४ स्मारके पोलिसांनी आज एकाच दिवशी उद्ध्वस्त केली. यामुळे त्या भागातील नागरिकांमध्ये असलेली भीती कमी होण्यास मदत होणार आहे.

दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या सप्ताहात ते मृत नक्षल्यांची स्मारके उभारुन त्यांना श्रद्धांजली वाहतात. पोलिसांचे सी-६० पथके, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि जिल्हा पोलिसांच्या १८ पथकातील ८०० जवानांनी विशेष अभियान राबवून आज वेगवेगळ्या भागातील जंगलात उभारलेली ४४ स्मारके एकाच दिवशी पोलिसांनी नष्ट केली.

यात एटापल्ली उपविभागीतल १८, हेडरी उपविभागातील १७, भामरागड उपविभागातील ७, जिमलगट्टा उपविभागातील २ आणि धानोरा व पेंढरी उपविभागातील प्रत्येकी एका स्मारकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नक्षल्यांचे आश्रयस्थान असलेल्या अतिदुर्गम पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी व गट्टा(जांभिया) परिसरातील ही स्मारके उद्ध्वस्त केल्याने आता सामान्य नागरिकांच्या मनात असलेली भीती नष्ट झाली. जिल्ह्यातील नक्षल चळवळ जवळपास संपली असून, नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस दल प्रयत्नशिल असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!