शुल्लक कारणावरून शेतशिवारात शेतकऱ्यांमध्ये वाद ; हाणामारी दरम्यान एक शेतकरी गंभीर जखमी
अविनाश रामटेके
विरूर स्टेशन
राजुरा तालुक्यातील मौजा विरूर स्टेशन परिसरात शुल्लक कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली असून यात शेतकरी बिलबल दरेकार गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी विरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलबल दरेकार व युवराज कस्टी यांची शेतजमीन एकमेकांना लागून आहे. दरेकार यांची गाय, बैल कस्टी यांच्या शेतात शिरल्याने दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपानुसार, युवराज कस्टी (रा. खांबाडा) यांनी काठीने दरेकार यांच्या पायावर वार केल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. घटनेनंतर जखमी दरेकार यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले असून, त्यांनी विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला असून
पुढील तपास विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुभाष कुळमेथे हे करीत आहे . शेतीची कामे सुरू असताना शुल्लक कारणावरून कामाचा खोळंबा झाला. मला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा जखमी शेतकरी बिलबल दरेकार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.








