Home नागपूर हॅप्पी माइंड्स प्रिस्कूल येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

हॅप्पी माइंड्स प्रिस्कूल येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

0
71

हॅप्पी माइंड्स प्रिस्कूल येथे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

नागपूर :- हॅप्पी माइंड्स प्रिस्कूल ओमकारनगर, नागपूर मध्ये नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन (Annual Day) अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास पालक, मान्यवर व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणांनी सर्वांची मने जिंकली. छोट्या छोट्या मुलांनी आकर्षक वेशभूषेत विविध विषयांवर आधारित सुंदर नृत्याविष्कार सादर केले. त्यांच्या निरागस हास्याने व तालबद्ध सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दीपप्रज्वलन प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.अजय चिकाटे व सौ चिकाटे, शाळेचे डायरेक्टर श्रीकांत बुलकुंडे व प्रिंसिपल अस्मिता बुलकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले .त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, सामाजिक संदेश देणारे ,सेमी क्लाॅसिकल व ब्लॅक आणि वाईट जमान्यातील रेट्रो साॅंग ईत्यादी वर सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या कलागुणांची झलक दाखवली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याचा शाळेचा उद्देश स्पष्टपणे दिसून आला.

मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या प्रा. चिकाटे सरांनी मुलांना आवडेल अशी सुंदर कविता सादर केली व निरागस मुलांचे बालपण जपण्यासाठी मार्गदर्शन केले. शाळेच्या प्रिंसिपल अस्मिता बुलकुंडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व पालकांनी आमच्या वर विश्वास व पाठिंबा देऊन सहकार्याबद्दल आभार मानले. “हसत-खेळत शिकूया, आत्मविश्वासाने वाढूया” हा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिक्षकवृंदांचे विषेश कौतुक केले, प्रेमळ मन, सहनशीलता आणि संयम असे आवश्यक गुण सांगितले, पालकांचे विशेष कौतुक करण्यात आले.
शिक्षणा बरोबरच खेळाची आवड स्पोर्ट्स डे ला पूर्ण करण्यात आली होती,त्याचे बक्षीस वितरण विशेष अतिथी निशिकांत बुलकुंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आनंद, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन कल्पना आर. यांनी व आभार प्रदर्शन प्रिती भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पृथ्वी बोरकर व नर्सरी टिचर ट्रेनिंग च्या निवेदिता नावले, सोनाली महतो, नाजनीन , प्रणाली बनसोड, लिना घोषाल, अंकिता साकोरे व अंशु चौधरी ईत्यादी नी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!