Home चंद्रपूर घुग्घूस नगरपरिषद उप – नगराध्यक्षपदी राजुरेड्डी यांची बहुमताने निवड

घुग्घूस नगरपरिषद उप – नगराध्यक्षपदी राजुरेड्डी यांची बहुमताने निवड

0
160

घुग्घूस नगरपरिषद उप – नगराध्यक्षपदी राजुरेड्डी यांची बहुमताने निवड

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या घुग्घूस उप – नगराध्यक्षाची निवडणूक शांततेत पार पडली

 

घुग्घूस :- नगरपरिषदेच्या नगर उपाध्यक्ष पदाची तसेच स्विकृत सदस्यपदाची निवडणूक आज दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी दुपारी 01 वाजता पार पडली गेल्या अनेक दिवसापासून अगदी अटी – तटीच्या झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते.

उप – नगराध्यक्ष पदा करीता तीन नामांकन दाखल झाले काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व रोशन पचारे तर भाजपच्या वतीने गणेश पिंपळकर यांनी नामांकन दाखल केले शेवटच्या क्षणी रोशन पचारे यांनी आपली उमेदवारी परत घेतली हात उंचावून खुल्या पद्धतीने घेण्यात आली यात राजुरेड्डी यांना एकूण 16 मते तर गणेश पिंपळकर यांना 07 मते मिळाली.
रेड्डी यांचा बहुमताने एकतर्फी विजय झाला काँग्रेस तर्फे स्विकृत सदस्य म्हणून तौफिक शेख यांना नियुक्त करण्यात आले तर भाजपा तर्फे ज्येष्ठ नेते निरीक्षण तांडरा यांची निवड करण्यात आली.

आज सकाळ पासूनच शहरातील उत्कंठा शिगेला पोहचली होती काँग्रेस पक्षाचे खासदार प्रतिभा धानोरकर व सुभाष धोटे सकाळी 11 वाजताच घुग्घूस येथे पोहचले होते.
तर माजी मंत्री तथा आमदार विजय वड्डेटीवार हे दुपारी 01 वाजता घुग्घूस येथे पोहचून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले तसेच नगराध्यक्षा दिप्ती सुजित सोनटक्के यांच्या पदग्रहण सोहळ्यात उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या वड्डेटीरांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांचे मनोबल व उत्साह प्रचंड रित्या वाढला हे विशेष!
गेल्या अनेक दिवसापासून शहरात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चे व शहरातील वाढता तान – तणाव लक्षात घेता पोलीस अधिक्षक सुदर्शन मुमक्का व पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!