Home नागपूर माहिती अधिकार कार्यकर्ता संगठन बैठक संपन्न ; कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी लढणार – सुशांत...

माहिती अधिकार कार्यकर्ता संगठन बैठक संपन्न ; कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी लढणार – सुशांत गणवीर जिल्हा प्रमुख

0
91

माहिती अधिकार कार्यकर्ता संगठन बैठक संपन्न ; कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी लढणार – सुशांत गणवीर जिल्हा प्रमुख

 

नागपुर l प्रतिनिधी : नागपुर येथे सुशांत गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार कार्यकर्ता संगठन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला नागपुर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांना संगठन त्यांना कशा प्रकारे मदत करेल याचे मार्गदर्शन करण्यात आले.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नागपुर जिल्हा प्रमुख सुशांत गणवीर यांनी बैठकीबाबत “टाइम्स ऑफ़ ऑरेंज सिटी’ शी बोलतांना सांगितले की, शासकीय कर्मचारी माहितीचा दुरुपयोग करीत असून याचा सर्व आरोप माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनवर फोडून माहिती अधिकारी कार्यकर्त्यांची बदनामी करत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून माहितीतर मिळत नाही मात्र माहिती अधिकारी कार्यकर्त्यांवर खंडणीसारखे गुन्हे दाखल केले जात आहेत. कार्यकर्ता हा एकाकी असल्याने त्यावर विविध गुन्हे दाखल होत आहेत. तो एकाकी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे. त्याला न्याय मिळत नाही. त्याला न्याय मिळावा यासाठी संघटनेचे बळ हे सर्वात मोठे बळ आहे. जे लोक पिडीत आहेत ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणे आणि लोकामध्ये माहिती अधिकाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हे संगठन काम करणार असल्याचे सुशांत गणवीर यांनी सांगितले. यावेळी नागपुर चे उपाध्यक्ष कैलास गोंडाने, प्रचार प्रमुख पंचशील वालके, रवि येडलवार नरेश मसराम, अनिल आगलावे, मनीष रंगारी, विशवाकुमार रंगारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचा आभार उपाध्यक्ष कैलास गोंडाने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!